त्यातूनच ही एक महत्त्वाची योजना आहे आणि आपल्याला माहीतच आहे शेतामध्ये आपल्याला जर विहीर घ्यायचे असेल तर त्याचा साधारण खर्च हा सर्वसामान्य शेतकऱ्यांना परवडणारा नसतो त्यामुळे शासनाने या गोष्टीचा विचार करून ही योजना राबवली आहे ही विहीर अनुदान योजना 2024 पासून महाराष्ट्र मध्ये सुरू झाली आहे.
अशा विविध योजनांपैकी आता महाराष्ट्र शासनाने Get Free Well Subsidy ही योजना राबवत आहे आता या योजनेमध्ये आपल्याला नेमका फायदा कसा होणार आहे, आणि यासाठी आपल्याला कागदपत्रे कुठली लागणार आहेत, आपण यामध्ये कसे पात्र होऊ शकतो. या संबंधित सर्व महत्त्वाच्या माहिती हे खाली पाहणार आहोत त्यासाठी ही माहिती अतिशय काळजीपूर्वक वाचा.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्यापाशी कुठले कागदपत्र असून गरजेचे आहे ते पाहू.
शेतकऱ्यांसाठी महत्वाची योजना
बियाणे अनुदान योजना 100% मिळणारच|Biyane Anudan Yojana 2025
Tractor Anudan Yojana 2025|100% असा करा अर्ज राज्य सरकार देणार 3.15 लाखाचे अनुदान
विहीर अनुदान योजना कागदपत्रे 2025
- संबंधित शेतकऱ्याचे आधार कार्ड
- शेत जमिनीचे कागदपत्र जसे 7/12 (सातबारा) नमुना 8 अ,आणि इतर शासकीय शेती संबंधातील दस्तावेज
- शेतकऱ्याच्या बँक खात्याचे विवरण.
- एससी एसटी ओबीसी मधील शेतकरी असेल तर जाती प्रमाणपत्र.
- शेतकऱ्याचे पासपोर्ट साईज फोटो.
- या योजनेमध्ये सहभागीचा असेल तर हे कागदपत्र आपल्यापाशी असणे अत्यंत आवश्यक आहे अन्यथा तुमचे अर्ज हे अपात्र ठरेल.
Vihir Anudan Yojana Eligibility (विहीर अनुदान योजना पात्रता)
- शेतकऱ्याकडे सलग एक एकर शेती असणे आवश्यक आहे.
- पिण्याच्या पाण्याच्या विहिरी पासून 100 मीटर पर्यंत अंतर असणे आवश्यक आहे.
- दोन विहिरीमध्ये 250 मीटर अंतर असणे आवश्यक आहे.
- मागासवर्गीय व दारिद्र रेषेखालील कुटुंबासाठी हा नियम नाही.
- सातबारावर यापूर्वी विहिरीची नोंद नसावी.
- याबरोबरच अर्ज शेतकरी हा जॉब कार्डधारक असावा. तरच मनरेगा अंतर्गत या योजनेचा लाभ घेता येतो.
- आता या योजनेमध्ये आपल्याला ऑनलाइन कसे अप्लाय करायचे ते आपण खाली पाहणार आहोत.
Vihir Anudan Yojana 2025 Online Registration
- तुमच्या मोबाईलमध्ये इंटरनेट सुविधा सुरळीत सुरु असल्याची खात्री करा.
- मोबाईल मधील गुगल प्ले स्टोअर हे ॲप ओपन करा.
- Google Play Store App ओपन केल्यावर सर्च बारमध्ये Maha EGS app असा शब्द टाकून सर्च करा.
- जसे हि तुम्ही Maha EGS app सर्च कराल त्यावेळी तुमच्या स्क्रीनवर हे app दिसेल ते इंस्टाल करून घ्या.
- विहिरीसाठी ऑनलाईन प्रस्ताव सादर करा.
- Maha EGS app ओपन करा. या ठिकाणी तुम्हाला दोन पर्याय दिसतील एक म्हणजे लाभार्थी लॉगीन आणि दुसरा म्हणजे विभागाचे लॉगीन. लाभार्थी लॉगीन या पर्यायावर टच करा.
- तीन पर्याय या ठिकाणी तुम्हाला दिसतील 1)बागायती लागवड अर्ज 2)विहीर अर्ज 3)अर्जाची सद्यस्थिती. यापैकी विहीर अर्ज या पर्यायावर टच करा.
तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला सुद्धा शेतामध्ये विहीर घ्यायची आहे किंवा जुनी विहीर असेल त्याला दुरुस्त करायचा असेल तर या योजनेचा लाभ तुम्ही नक्कीच घ्या.
अनुदान आहे त्याच्यामुळे तुम्हाला खूप मोठा फायदा होणार आहे, सरकारी योजना किंवा सरकारी नोकरी संबंधित माहितीसाठी आपल्या yojanavarta.in या ऑफिशियल वेबसाईटला नक्कीच फॉलो करून ठेवा.
0 टिप्पण्या