घरकुल योजनांच्या यादी झाली जाहीर, पहा तुमचे नाव आहे का नाही
तर मित्रांनो आपले स्वतःचे म्हणजेच हक्काचे घर असावे ही सर्वांची इच्छा असते त्यामुळे महाराष्ट्र शासनाने Gharkul म्हणजेच “प्रधानमंत्री आवास योजना” राबवण्याचा निर्णय घेतला ज्याच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांना घर बांधण्यामध्ये सरकार आर्थिक मदत करते ज्याच्यामुळे लोकांना घर बांधण्यामध्ये मोठा फायदा मिळतो. आणि या योजनेअंतर्गत लाखो लोकांचे वर्षापासून स्वतःचे घर असावे हे स्वप्न पूर्ण होण्यास मदत होते.
पीएमएवाय यादी अंतर्गत लाभार्थी कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्नाच्या आधारे चार श्रेणींमध्ये विभागले गेले आहेत.MESCO Bharti 2025
योजना चे नाव
प्रधानमंत्री आवास योजनेचे लाभार्थी
लाभार्थी
कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS)
3 लाख रुपयापर्यंत
कमी उत्पन्न गट (LIG)
3 लाख रुपये ते 6 लाख रुपयापर्यंत
मध्य उत्पन्न गट – 1 (MIG-1)
6 लाख रुपये ते 12 लाख रुपयापर्यंत
मध्य उत्पन्न गट – 2 (MIG-2)
12 लाख रुपये ते 18 लाख रुपयापर्यंत
प्रधानमंत्री आवास योजना
सर्वसामान्य लोकांना त्यांचे हक्काचे घर असावे यासाठी योजना राबवण्यात आली तर शहरी भागासाठी ही योजना 25 जून 2015 सुरू करण्यात आली व तसेच ग्रामीण भागामध्ये 1 एप्रिल 2016 ला सुरू करण्यात आले, या योजनेच्या मार्फत आता पर्यंत जवळपास 2 करोड पेक्षा जास्त घरे बांधली आहेत.
आता आणखीन जास्त घरे बांधण्यात यावी असे सरकारचे धोरण आहे यामुळे सरकारने आता Pradhan Mantri Awas Yojna 2.0 सुरू करणार आहे जो की दुसरा टप्पा सुद्धा मांडला जाऊ शकतो.
आता या संबंधित तुमच्या मनामध्ये भरपूर प्रश्न पडले असतील जसे की प्रधानमंत्री आवास योजना Online Apply कसा करायचा? आणि घरकुल योजना अर्ज कोठे करायचा? यासारख्या विविध प्रश्नांचे उत्तर आपण खाली पाहणार आहोत त्यासाठी ही पोस्ट अगदी काळजीपूर्वक वाचा.
नोट :- या संबंधित संपूर्ण माहिती करिता आपल्याला या योजनेच्या ऑफिशियल वेबसाईट वरती जाऊन सर्व माहिती व्यवस्थित पाहिजे आहे आणि नंतरच अप्लाय करायचा आहे.
योजनेचे फायदे काय?
- 19.67 लाख लोकांना घर मिळेल
- महिलांच्या नावावर घर मिळाल्याने त्यांना बळकटी मिळेल
- रोजगार मिळतो
- लोकांचं जीवन सुधारतं
- घरात सौरऊर्जा आणि पावसाचं पाणी साठवण्यासाठी विशेष सुविधा दिल्या जातात.
प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत शहरात आणि ग्रामीण भागात किती पैसे मिळतात?
- शहरात राहणाऱ्यांना
- गावात राहणाऱ्यांना
घर बांधण्यासाठी 1 लाख 20 हजार रुपये मिळतील.
आता ही जी रक्कम तुम्हाला मिळणार आहे ही तुमच्या डायरेक्ट बँक खात्यामध्ये जमा होते त्यासाठी तुमचे आधार कार्ड बँक अकाउंट ची लिंक असले पाहिजेत लिंक नसेल तर तुम्हाला या योजनेचा फायदा होणार नाही ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे त्यामुळे लक्षात घ्यावी.
प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत महाराष्ट्रातील किती लोकांना घर मिळणार?
आता या Pradhan Mantri Awas Yojna 2.0 योजनेच्या अंतर्गत जवळजवळ 20 लाख लोकांपर्यंत ही योजना पोहोचेल अशी अपेक्षा आहे.
याचा अर्थ असा की आता 20 लाख लोकांना स्वतःचे घर असावे ही जी स्वप्न आहेत ते पूर्ण करणार आहे.
प्रधानमंत्री आवास योजना साठी लागणारे महत्त्वाचे कागदपत्रे
मित्रांनो महाराष्ट्र शासन असेल किंवा केंद्र शासन असेल यांच्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यामध्ये कागदपत्र हा अतिशय महत्त्वाचा भाग असतो त्यामुळे तुमचे कागदपत्र हे पूर्ण तयार असले पाहिजेत आता या योजनेसाठी सुद्धा काही कागदपत्रे आहेत जी की तुम्हाला लागणार आहेत ते खाली यादी दिलेली आहे ते तपासून पहा.
हे कागदपत्र तुमच्याकडे असेल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता अन्यथा तुम्हाला याचा लाभ मिळणार नाही.
- जमिनीचे कागद – 7/12 उतारा, मालमत्ता पत्र
- ओळखपत्र – आधार कार्ड, मतदान कार्ड, रेशन कार्ड
- जात व गरीबीचे कागद – जात प्रमाणपत्र, BPL कार्ड
- बँकेचे कागद – बँक पासबुक (जनधन खातं असेल तर उत्तम)
- इतर कागद – वीजबिल, मनरेगा कार्ड (गावासाठी)
आता हे झाले कागदपत्राबद्दल माहिती आता ज्या वेळेला तुम्ही फॉर्म भरून देता आणि नंतर ना तुमचे नाव सिलेक्ट झाले आहे का नाही हे पाहण्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल हे आता आपण खाली पाहणार आहोत.
तुमचे नाव यादीत आले आहे का हे कसे पहावे?
ही योजना सुरू झाली आहे व आता नवीन यादी आली आहे या यादीमध्ये तुमचे नाव आले का नाही हे चेक करण्यासाठी तुम्हाला यांच्या दिलेल्या ऑफिशियल वेबसाईट वरती जाऊन चेक करावा लागेल त्याची लिंक आम्ही तुम्हाला खाली देणार आहोत.
अर्ज कसा करायचा?
महाराष्ट्र शासनाने या योजनेत यामध्ये अर्ज करण्यासाठी ऑफलाइन आणि ऑनलाईन या दोन्ही सुविधा दिल्या आहेत त्यामुळे तुम्ही तुमच्या सोयीनुसार ऑनलाइन किंवा ऑफलाईन अर्ज करू शकता.
ज्याचे पद्धत आम्ही तुम्हाला खाली दिलेली आहे तुम्हाला त्या पद्धतीने फॉर्म भरायचा आहे आणि सबमिट किंवा जमा करून द्यायचा आहे.
ऑनलाइन अर्ज:
- वेबसाईटवर जा
- “नवीन नोंदणी” वर क्लिक करा
- माहिती भरा आणि कागदपत्र अपलोड करा
- अर्ज पाठवा आणि पावती घ्या
ऑफलाइन अर्ज:
- गावात ग्रामपंचायतमध्ये किंवा शहरात नगरपालिका कार्यालयात जा
- अर्जाचा फॉर्म घ्या आणि भरा
- कागदपत्रांसह अर्ज द्या
Conclusion:-
महाराष्ट्र आणि केंद्र शासनाने ही जी प्रधानमंत्री आवास योजना 2025 योजना आहे हे सर्वसामान्य गोरगरीब लोकांसाठी राबविली आहे ज्याच्या माध्यमातून त्यांच्या स्वप्नाचे घर बांधण्यास आर्थिक मदत होईल, वाढत्या महागाईला पाहता सरकाराने ही योजना राबवण्याचे ठरवले, याच्या माध्यमातून करोडो लोकांना घर बांधण्यास मदत झाली व त्यांच्या स्वप्न पूर्ण झाले आणखीन सुद्धा सरकार या योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांपर्यंत हे पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे.
तर तुम्ही तुमच्या जवळपास जे लोक आहे ज्यांना घरकुल योजनेचा लाभ झाला नाही किंवा त्यांना याबाबत माहिती नाही त्यांनाही पोस्ट शेअर करून याची माहिती देऊ शकता.
अशाच नवनवीन सरकारी योजना असतील किंवा सरकारी नोकरी संबंधित नवीन अपडेट माहितीसाठी आपल्या या वेबसाईटला आणि सोबतच Telegram ला सुद्धा जॉईन करून ठेवू शकता.
IMPORTANT LINKS
Official Website :- Click Here
Telegram :- Join
Website :- Click Here
0 टिप्पण्या