10 Sarkari Yojana Card | हेच ते महत्त्वाचे १० सरकारी कार्ड जे देतील तुम्हाला भरपूर फायदे.

10 Sarkari Yojana Card

 मित्रांनो केंद्र सरकार किंवा राज्य सरकार हे लोकांना प्रत्येक ठिकाणी मदत व्हावी म्हणून विविध प्रकाराची Sarkari Yojana राबवते, असे खूप Yojana आहेत परंतु आज आम्ही तुम्हाला 10 Sarkari Yojana Card बाबत माहिती देणार आहोत. जे तुमच्याकडं असणे खूप महत्वाचे आहे.

कारण भविष्यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकाराची सुविधा पाहिजे असेल तर ते या दहा कार्ड पैकी  १००% कोणता ना कोणता कार्ड उपयोगी पडणारच.

10 Sarkari Yojana यादी :-

१. आभा कार्ड (ABHA CARD) :-

 तर आभा कार्ड या माध्यमातून आपण जर कुठल्याही हॉस्पिटलमध्ये गेलो तर आपली संपूर्ण माहिती या डिजिटल कार्डामध्ये स्टोअर राहते म्हणजेच जर आपण हॉस्पिटलमध्ये सिटीस्कॅन, एक्स-रे, किंवा साधी पावती सुद्धा फाडली असेल तर ती डिजिटल सेव होऊन जाईल.

त्याचा फायदा असा होईल तुम्ही दुसऱ्या कुठल्याही दवाखान्यांमध्ये गेलात त्यावेळेला या कार्डच्या माध्यमातून तुमची सगळी इन्फॉर्मेशन त्या दवाखान्यात मिळून जाईल.

२. आयुष्मान भारत कार्ड (AYUSHMAN CARD) :-

 मित्रांनो आयुष्यमान कार्ड मध्ये आपल्याला पाच लाखापर्यंतचे दवाखान्याचा खर्च हा मोफत मध्ये होणार आहे, तर यामध्ये ऑपरेशन असेल किंवा छोट्या मोठ्या कुठल्याही आजार असेल त्याचे पाच लाखापर्यंतचा उपचार मोफत होणार आहे.

या योजनेमार्फत दिलेल्या हॉस्पिटलच्या नावाच्या यादी पैकी तुम्हाला तुमच्या जवळील हॉस्पिटलमध्ये इलाज करता येतो.

Mukhymantri Yuva Karya Prashikshan Yojana 2025 | प्रत्येक प्रशिक्षणार्थ्याला ही गोष्ट लक्षात आलीच पाहिजे. 

Gharkul Yojana 2025 | आता मिळणार 5 ब्रास वाळू अगदी मोफत. 

Mukhymantri Yuva Karya Prashiksha 2025 | एक प्रशिक्षणार्थी म्हणून आपले मनोगत नक्की वाचा.

३. शेतकरी कार्ड (FARMER ID CARD) :-

शेतकरी कार्ड शेतकऱ्यांसाठी खूप उपयुक्त ठरणार आहे कारण येणाऱ्या काळामध्ये सरकार हे शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना घेऊन येणार आहे किंवा ज्या योजना सध्या चालू आहेत त्यामध्ये या कार्डचा मोठा फायदा होणार आहे.

या कार्डाच्या माध्यमातून तुम्हाला शेती संबंधीत सर्व योजनांमध्ये सहभाग होता येतो त्यामुळे हे कार्ड प्रत्यक्ष शेतकऱ्यांकडे असावा अशा साठी सरकारने हे कार्ड काढले आहेत.

४. स्मार्ट राशन कार्ड (स्मार्ट राशन कार्ड) : -

 मित्रांनो स्मार्ट राशन कार्ड म्हणजे ज्याप्रमाणे आपले आधार कार्ड किंवा पॅन कार्ड हे स्मार्ट कार्ड आहेत त्याचप्रमाणे आता राशन कार्ड सुद्धा त्याच प्रकारात मिळणार आहे, त्यामुळे तुम्ही तुमच्या जवळील ई सेवा केंद्रावर जाऊन तुम्ही स्मार्ट राशन कार्ड सहजरीत्या मिळवू शकता.

हे कार्ड काढायचं असेल तर तुम्हाला मोबाईल मध्ये मेरा राशन या नावाचे ॲप्लिकेशन येईल ते डाऊनलोड करून त्याच्यातून तुम्ही डाऊनलोड करून घेऊ शकता.

५. मानधन योजना (MANDHAN YOJANA) :-

 मानधन योजनेमध्ये आपल्याला वय वर्ष 60 नंतर पेन्शन मिळणार आहे परंतु त्यासाठी आपल्याला वय वर्ष 18 ते 40 च्या आत मध्ये याचे रजिस्ट्रेशन करायचे आहेत.

महत्त्वाचे म्हणजे 18 ते 40 या वयापर्यंत आपल्या बँकेमधून काही अमाऊंट हे या योजनेमध्ये ॲड केला जाईल त्या मोबदल्यात वयाच्या 60 वर्षानंतर ना तुम्हाला पेन्शन दिला जाईल.

६. अपार योजना कार्ड (APAAR CARD) :-

 आपले सर्व शिक्षणाचे जी माहिती आहे ते डिजिटल स्टोअर करता येते म्हणजेच पहिली ते दहावीपर्यंतचे आणि बारावी ते ग्रॅज्युएशन पर्यंतचे सर्व इन्फॉर्मेशन जसे की पास झालेले डेट आपले मार्कशीट्स किंवा टीसी असं संबंधित जो डाटा आहे तो सर्व यामध्ये डिजिटल सेव राहतो.

आपण शाळा किंवा कॉलेज बदललो तर त्यावेळीला ह्या कार्डचा मार्फत आपल्याला सगळी इन्फॉर्मेशन नवीन शाळेमध्ये मिळून जाते.

७. ई- श्रम कार्ड (E- SHRAM CARD) :-

 ज्या लोकांकडे ई-श्रम कार्ड आहे त्यांना याचा फायदा असा होणार आहे की एखादा व्यक्ती जर एक्सीडेंट मध्ये मृत्यू झाला असेल किंवा एक्सीडेंट मध्ये अपंगत्व आला असेल तर त्या व्यक्तीला या कार्डचा मार्फत दोन लाख रुपये देण्यात येतो.

तर हे कार्ड सर्वांपाशी असणे अतिशय महत्त्वाचे आहे

८. जॉब कार्ड (JOB CARD) :-

 तर मित्रांनो हे जॉब कार्ड आहे ते ग्रामपंचायत मध्ये छोटे-मोठे काम करणारे किंवा मनरेगा या योजनेअंतर्गत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कार्ड दिला जातो हे कार्ड ऑनलाइन मिळत नसून हे आपल्याला ग्रामपंचायत मधूनच मिळवावा लागतो.

९. इलेक्शन कार्ड (ELECTION CARD) :-

 इलेक्शन कार्ड मित्रांनो जर तुमचे वय वर्ष 18 किंवा 18 पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला इलेक्शन कार्ड असणे अतिशय गरजेचे आहे कारण भरपूर योजनेमध्ये याचा उपयोग तर होतोच परंतु मतदानाच्या वेळी या कार्डाशिवाय तुम्हाला मतदानाचा अधिकार नसतो.

१०. किसान कार्ड (KISAN CARD) :-

 किसान कार्ड एक कार्ड आपल्याला ऑनलाइन काढता येत नसून या कार्ड घेण्यासाठी आपल्याला बँकेमध्येच जावावे लागते कारण यामध्ये योजनेअंतर्गत मधून बँकेतून आपल्याला शेतकामासाठी लोन मिळते.

तर मित्रांनो हे आहेत ते दहा कार्ड माहिती सहित सांगितली गेली आहे यापैकी कुठले कार्ड तुमच्याकडे नसतील तर ते लगेचच आपल्या जवळील ई सेवा केंद्राला भेट देऊन कार्ड काढून घ्या आणि सरकारी योजनेचा लाभ घ्या.

निष्कर्ष

  मित्रांनो सरकारी योजना हे सर्वसामान्य लोकांना भविष्यामध्ये उपयोग हवा यासाठी राबवला जातो व त्यासाठी काही कार्ड सुद्धा काढलेले असतात तरीका सर्वान कसे असावे यासाठी ही पोस्ट लिहिली गेली आहे तरीही जास्तीत जास्त लोकांना शेअर करून त्यांना सुद्धा ही माहिती पोहोचवावी, नम्र विनंती.

 आणि अशाच नवनवीन योजना किंवा उपयुक्त माहितीसाठी आपल्या yojanavarta.in या वेबसाईटला नक्की फॉलो करून ठेवा.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या