तर तर मित्रांनो आजचा या पोस्टमध्ये आपण Mukhyamantri Youva Kary Prashikshan Yojana यांचा मार्फत प्रशिक्षण घेत असलेल्या प्रशिक्षणार्थ्यांच्या मनामध्ये जो सध्या प्रश्न उद्भवत आहेत त्याच्यावरती आज सविस्तर माहिती पाहणार आहोत ज्यामधून त्यांची ज्या मनामध्ये चिंता आहेत त्या पूर्णपणे स्पष्ट होतील.
तर दिलेल्या माहितीनुसार प्रशिक्षणार्थ्यांना नवीन कार्यकाल जो पाच महिने वाढून दिला गेला आहे त्याची जॉइनिंग ही दिनांक 30 एप्रिल पर्यंत करायची आहे असं सरळ सांगण्यात आलेला आहे.
परंतु जे प्रशिक्षणार्थी शाळा, कॉलेज, या ठिकाणी कार्यरत आहेत त्यांना जॉईन कसे होणार? कारण आता सध्या उन्हाळा हा ऋतू चालू असल्यामुळे आता शाळा आणि कॉलेजला सुट्ट्या लागतात तर त्यांची जॉइनिंग होईल का? असा प्रश्न त्यांच्या मनामध्ये पडलेला आहे, त्याचसोबत खालील प्रश्न सुद्धा आहेत एकदा सविस्तर वाचून घ्या.
प्रशिक्षणार्थ्यांना पडलेले प्रश्न:
- जानेवारी आणि फेब्रुवारी चे पेमेंट कधी होणार?
- उपमुख्यमंत्र्यांची भेट कधी होणार आहे?
- ६+५ =११ महिने वाढवून दिल्यानंतर न्यायालयात न्याय मागता येईल?
ज्या प्रशिक्षणार्थ्यांचे कार्यकाळ संपले होते त्या प्रशिक्षणाचे कार्यकाळ वाढल्यानंतर त्यांना वापस त्याच ठिकाणावरती जॉईन करण्याचे आदेश आले होते परंतु, काही प्रशिक्षणार्थ्यांचे कार्यकाल हे जानेवारी फेब्रुवारी या महिन्यांमध्ये संपला असून सुद्धा त्यांना परत जॉईन करा असा कुठलाच आस्थापनेतून फोन किंवा मेसेज मिळाला नाही.
Mukhymantri Yuva karya prashikshan 2025 | आनंदाची बातमी आलीच समजा.
पोस्ट ऑफिस लोन योजना जाणून घ्या| Post Officer Loan Yojana Online Apply
तर ते प्रशिक्षणार्थी नेहमी आस्थापनेच्या संपर्कात आहेत आस्थापनेचे म्हणणे असे आहे की आम्हाला वरून कुठलाच ऑर्डर आला नाही त्यामुळे आत्ताच कुठली माहिती देऊ शकत नाही, या घटनेमुळे प्रशिक्षणार्थी गोंधळात पडलेले आहेत,
जिल्हा परिषद किंवा कॉलेजमध्ये कार्यरत असलेल्या प्रशिक्षणार्थ्यांसाठी :
तर मित्रांनो जे प्रशिक्षणार्थी हे कार्यप्रशिक्षण अंतर्गत जिल्हा परिषद किंवा कॉलेजमध्ये कार्यरत आहेत त्यांच्यासाठी थोडासा प्रॉब्लेम येथे झालेला दिसून येत आहे कारण, हिंगोली जिल्ह्यांमध्ये एक असा पत्र आलेला आहे की मे आणि जून महिन्यामध्ये जिल्हा परिषद शाळा असतील किंवा कुठल्याही शाळा असतील त्यांना सुट्टी असतात.
शाळेला सुट्टी असल्यामुळे प्रशिक्षणार्थी हे कसे आपले प्रशिक्षण घेऊ शकतात असा प्रश्न चित्र उद्भवत आहे त्यामुळे त्या ठिकाणी स्थापनेचे म्हणणे आहे की, ते वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाचे वाट पाहत आहेत, आणि या गोष्टीचा नक्कीच तोडगा निघेल अशी अपेक्षा सुद्धा प्रशिक्षणार्थ्यांची आहे.
जानेवारी आणि फेब्रुवारीची पगार कधी होणार?
तर मित्रांनो काही प्रशिक्षणाचे जानेवारी आणि फेब्रुवारी या महिन्याची पेमेंट झाली नसून अशी माहिती मिळत आहे की सध्या मार्च एन्ड असल्यामुळे शासनाकडे पगार होण्यामध्ये थोडासा विलंब होऊ शकतो, परंतु यामध्ये काळजी करण्यासारखे काही नाही कारण आपली पेमेंट होणार आहे होता होईल तितक्या लवकर पेमेंट करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
उपमुख्यमंत्री अशी भेट कधी होणार?
तर मित्रांनो आता राहिला प्रश्न उपमुख्यमंत्र्याशी भेटीचा तर मित्रांनो जे मुंबई येथे आझाद मैदानावर होत असलेल्या आंदोलनामध्ये हजारोंच्या संख्येत प्रशिक्षणार्थी तिथे उपस्थित आहेत तरी काल मुख्यमंत्र्याचे सहाय्यक हे श्री. बालाजी पाटील चाकूरकर साहेबांना भेट घेतले होते.
त्यानंतर उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याशी भेट होणार होती पर काही कारणास्तव त्यांची भेट झाली नसून ते शक्यतो आज होऊ शकते, नक्कीच या भेटीत मधून काहीतरी सकारात्मक निकाल हा प्रशिक्षणार्थ्यांचा बाजू कडून लागेल अशी अपेक्षा बाळगली जात आहे मित्रांनो हा सध्यापर्यंतचा अपडेट आहे.
पुढील असेच नवनवीन माहिती किंवा अपडेट प्रशिक्षणाबाबत असो किंवा सरकारी कुठल्याही योजनेबाबत जर तुम्हाला अपडेट किंवा माहिती पाहिजे असेल तर आपल्या या yojanavarta.in वेबसाईटला नक्कीच फॉलो करून ठेवा.
निष्कर्ष :
या वेबसाईट च्या माध्य्मातून आम्ही तुम्हाला sarkari yojana ची माहिती तसेच आपल्या उपयोग व्हावा अश्या योजना ची माहिती दिली जाते.
0 टिप्पण्या